दिनांक : १५ ऑगस्ट२०२४}
भारताच ७८ व्या स्वातंत्र्य दिन विद्या प्रतिष्ठान,इंदापूर येथे उत्साहात संपन्न झाला.संकुलाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी आठ वाजता विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य श्री निलेश काळदाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले व मार्चपास (परेड) सादर केले . प्राचार्य निलेश काळदाते यांनी उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहिले पाहिजे तरच त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुजय देशपांडे व इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. ज्योती जगताप ,उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
