दि. १३ ऑक्टोबर

भरणेवाडी तालुका इंदापूर येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान यात्रा भरणेवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. कोरोना काळानंतर प्रथमच उत्साही वातावरणात महाराष्ट्रातील सर्व  धर्मीयांचे सण, उत्सव थाटामाटात संपन्न होत आहेत, याचा आनंद साहजिकच जनतेच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

इंदापूर तालुक्यातील लाखों भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भरणेवाडी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान यात्रेनिमित्त इंदापूर तालुक्याचे आमदार श्री दत्तात्रय(मामा) भरणे यांनी आज भरणेवाडी येथील श्री क्षेत्र बिरोबारायाचे मनोभावे दर्शन घेऊन माझा शेतकरी राजा सुखी आणि समृद्ध होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *