
निर्भया पथकाची बारामतीतील बेशिस्त वाहन चालकावर दंडात्मक कारवाई
इंदापूर प्रतिनिधी:- प्रकाश आरडे: दि. १ सप्टेंबर
गेल्या काही दिवसात निर्भया पथकामार्फत दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यात बेधडक कारवाई चे सत्र सुरू असून, महिला ,मुले ,मुली व शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, कंपनीतील महिला कामगार तसेच बाजारपेठेमध्ये महिला व मुली यांची आपले संरक्षण कसे करावे याकरिता जनजागृती करण्याचे काम निर्भया पथकामार्फत जोमात चालू असून त्यास लोकांमधून उदंड असा प्रतिसाद मिळत आहे व सामान्य कष्टकरी महिला पासून उच्चपदस्त महिला व शालेय विद्यार्थिनी यांच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होऊन कसल्याही संकटाला तोंड देण्याची तयारी त्यांची असल्याचे दिसत आहे. निर्भया पथकामार्फत तशी त्यांच्या मनाची तयारी होईल असे प्रबोधन व जनजागृती या पथकामार्फत अतिशय समर्पक उदाहरणासह निर्भया पथकातील सर्व कर्मचारी करीत आहेत विशेषतः निर्भया पथकातील महिला पोलीस हवालदार अमृता प्रवीण भोईटे या अतिशय तळमळीने हे कार्य करताना दिसत आहेत.
आज बारामती येथे निर्भया पथकामार्फत बारामती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शहरात विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसर,सीसी कॉर्नर,अभिमन्यू कॉर्नर,संदीप कॉर्नर,विद्या प्रतिष्ठान मेन गेट समोर तसेच पेन्सिल चौक या ठिकाणी पेट्रोलिंग करून बेशिस्त वाहन चालवणाऱ्या मुलांवर त्यामध्ये ट्रिपल सीट,विदाऊट लायसन,
लायसन जवळ न बाळगणे,
मोबाईल संभाषण,अशा एकूण 27 केसेस करून एकूण दंड-35,000 रुपये वसूल केला महाविद्यालय परिसरामध्ये मुले मोठ्या प्रमाणावर ट्रिपल सीट,कट मारणे,मोबाईल फोनवर बोलत गाडी चालवणे,लायसन जवळ न बाळगणे,लायसन नसणे अशा प्रकारे बेशिस्त पणे गाड्या चालवत असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते यापुढे वेळोवेळी निर्भया पथकामार्फत अशा मोटरसायकल स्वरांवरती नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे तसेच बेशिस्तपणे वर्तन करणाऱ्या आठ मुलांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदर कारवाई बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
