दि. १८ ऑक्टोबर
इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांचे खंदे समर्थक दादासाहेब सोनवणे यांचा उद्या होणारा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने संपन्न होणार असून, या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी राज्यमंत्री,आमदार दत्तात्रय भरणे असून अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर उपस्थित राहणार आहेत.

या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तर होणार आहेतच,परंतु समाजामध्ये जे निराधार वयोवृद्ध माता-पिता आहेत त्यांची दिवाळी गोड व्हावी या आनंदीमय सणाचा आनंद त्यांनाही घेता यावा व त्यांच्याही अंगावर नवीन कपडे असावेत ही कल्पना दादासाहेब सोनवणे यांच्या मनामध्ये आली व त्यांनी निराधार माता पित्यांना साडी, धोतर, शर्ट मोफत वाटपाचा कार्यक्रम देखील ठेवला आहे. याच वैशिष्ट्यमय उपक्रमामुळे उद्याच्या वाढदिवसाची शोभा द्विगणित होणार हे निश्चित.
