इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ साठी प्रभाग क्रमांक नऊ मधून अनुसूचित जाती महिला प्रवर्ग मधून दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोळे यांच्या सुविद्य पत्नी मनीषा पाटोळे यांचा उमेदवारी अर्ज दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांच्या आदेशान्वये दाखल करण्यात आला.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोळे म्हणाले की संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सर यांच्या आदेशान्वये माझी पत्नी मनीषा यांचा उमेदवारी अर्ज या प्रभागातून दाखल करण्यात आला आहे. संघटनेच्या माध्यमातून प्रभागांमध्ये व शहरांमध्ये विविध लोकोपयोगी कामे केलेने व युवकांचे मजबूत संघटन व ज्येष्ठांचा आशीर्वाद व घराघरात असणारा संपर्क यामुळे निश्चित आमचा विजय होणार आहे. पुढे बोलताना असेही म्हणाले की पत्नी मनीषा हीने महिलांच्या स्वावलंबनासाठी व बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी करण्यात आलेली कामे या बळावरच आमचा विजय निश्चित आहे. ते असेही म्हणाले की बाबासाहेबांच्या संविधानावर असणारा विश्वास व लोकशाही बळकट करण्यासाठी कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तो शेवटपर्यंत राहणारच हि काळया दगडावरची रेष आहे, आम्हाला कुणीही हलक्यात घेऊ नये असाही इशारा त्यांनी नाव न घेता केला आहे.

इंदापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे कोण होणार नगराध्यक्ष व कोण होणार नगरसेवक यासाठी आत्तापासूनच चढाओढ लागलेचे चित्र दिसत आ

हे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *