दि. ०७ नोव्हेंबर

इंदापूर : (०७ नोव्हेंबर) :आज दि. ०७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सिल्लोड येथील सभेची पूर्वतयारी पाहणी करत असताना एबीपी माझा शी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी शिर्डी येथे ५० खोकेे विषयी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारले असता,विरोधकावर टीका करताना म्हणाले की आमच्यावर खोके म्हणणारे लोक भिकार*** असल्याचे म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी असाच उल्लेख केला. एकदा नाही तर दोन वेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यभर निषेध व्यक्त होत आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी ,राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फायर ब्रँड नेत्या व इंदापूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष छायाताई पडसळकर यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध केला. मंत्री सत्तार यांनी माफी मागावी व राज्य सरकारने त्यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व इंदापूर तालुक्याच्या वतीने आम्ही महिला पदाधिकारी उग्र आंदोलन उभारू असा गर्भित इशारा दिला आहे.
त्या पुढे म्हणाले की शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचे हेच का हिंदुत्व, हीच का संस्कृती व महिला विषयी हाच का आदर असा रोखठोक सवाल छायाताई पडसळकर यांनी केला. त्या असेही म्हणाले की आशि शिवराळ भाषा वापरणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राज्य सरकारने तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही पक्षाच्या सर्व पदाधिकारी इंदापूर तालुक्याच्या वतीने उग्र आंदोलन उभारणार आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना २४ तासात माफी मागा असा अल्टीमेटम दिला आहे. शिंदे सरकार विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष उभा राहिला आहे.
