दि. २३ डिसेंबर

दिनांक १८ डिसेंबर रोजी तालुक्यात पार पडलेल्या २६ ग्रामपंचायत पैकी हिंगणगावची ग्रामपंचायत अनेकविध  कारणाने चर्चेत राहिली. भैरवनाथ ग्राम विकास पॅनल व जय तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल समोरासमोर लढले. दोन्ही पॅनल चा प्रचार अतिशय शांततेत झाला. भैरवनाथ पॅनल ची सारी सूत्रे माजी सरपंच रमेश (दादा) देवकर, बिभीषण देवकर, सिद्धेश्वर खराडे ,धनाजी खराडे, मा. उपसरपंच विजय काटे, बाळासाहेब शाहूराव देवकर ,परमेश्वर (नाना) देवकर, राहुल (बब्रुवान) आरडे,  संतोष आरडे, नितीन आरडे, बाळासाहेब खराडे अशोक देवकर यांनी सांभाळली.  पॅनल प्रमुख रमेश (दादा) देवकर यांनी निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडताना मतदारांना ही लढाई आपल्या स्वाभिमानाची व अस्तित्वाची आहे अशी भावनिक साद घातली. हिंगणगाव ग्रामपंचायत निवडणूक संवेदनशील म्हणून जाहीर झालेली असली तरी शांततेतच पार पडली.
          भैरवनाथ ग्रामविकास पॅनल हा स्वर्गीय शरद (बापू) देवकर यांच्या स्वाभिमानी विचारांनी प्रेरित असाच होता.स्वर्गीय शरद (बापू) देवकर यांनी अखेरपर्यंत राजकारणात पदासाठी कधीही तडजोड केली नाही. गोरगरीब,दिनदलित,कष्टकरी,वंचित, घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रसंगी स्वकीयांशी व प्रस्थापितांबरोबर संघर्ष केला. त्यामुळेच या निवडणुकीत वरील वर्गातील सर्वांनीच भैरवनाथ ग्रामविकास पॅनल ला भरभरून मताचे दान दिले. नऊ सदस्य व जनतेतून थेट  सरपंच निवड अशी रचना असणाऱ्या ग्रामपंचायतीचा निकाल अचंबित करणारा असा झाला. सहा सदस्य व सरपंच निवडून आल्याने या गटाची सत्ता ग्रामपंचायतीवर आली.
                  या निवडणुकीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे स्वर्गीय शरद (बापू) देवकर गटाची सत्ता यावी  असे वाटणाऱ्या ग्रामस्थ, मतदाराबरोबरच पंचक्रोशीतील अनेकांनी हातभार लावल्यचे बोलले जात आहे.  या दणदणीत विजयामुळे स्वर्गीय शरद (बापू) देवकर यांना मानणाऱ्या सामान्य मतदाराच्या आशा पल्लवीत झाल्य आहेत. आपण सर्वजण एकत्र आहोत याची खात्री पटल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (जि.प.,प.समिती ) या गटाची मते निर्णयाक ठरण्याची शक्यता आहे.  स्वर्गीय शरद (बापू) यांना मानणारा वर्ग संपूर्ण जिल्हा परिषद गटांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांनी ग्रामपंचायत निकालानंतर स्वराज्य न्यूज शी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की जो पक्ष किंवा नेता आपल्या गटाला योग्य न्याय देईल त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणाने राहायचे .हीच स्वाभिमानाची शिकवण स्वर्गीय शरद बापूंनी आम्हाला दिलीय.दिलेला शब्द ठामपणे पाळणारा नेता म्हणून स्वर्गीय शरद बापूंची ओळख होती ,म्हणूनच बहुजन समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असायचा. आणि याच कारणामुळे या जिल्हा परिषद गटातील हि मते   निर्णयाक आहेत.
हिंगणगावातील मातंग समाजाने स्वर्गीय शरद बापूंची साथ अखेरपर्यंत सोडली नाही. कायम एकनिष्ठ राहिल्याने जेमतेम या समाजाची १५० मतदान तरीही या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचासह दोन सदस्य निवडून आले हा या ग्रामपंचायतीच्या इतिहासातील दुर्मिळ योग आहे .एकाच समाजाचे तीन उमेदवार निवडून येणे हा या ग्रामपंचायतीचा इतिहास झालाय.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालानंतर हा विजय स्वर्गीय शरद बापूंना अर्पण अशा भावना अनेकांनी व्यक्त करून आनंदाश्रूचा महापुर वाहिला.
एक मात्र निश्चित  स्वर्गीय शरद (बापू) देवकर गट सध्याचे राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *