इंदापूर दि २८ : परमपूज्य गुरुमाऊलीच्या व  शक्ती स्थळ दिंडोरी च्या आदरणीय श्री चंद्रकांत दादा यांच्या कृपाशीर्वादाने व आदरणीय श्री सतीश दादा मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रथ व पादुका यांचे शुभ आगमन झाले इंदापूर शहरातील व तालुक्यातील आणि सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी पादुका पूजन करून रथाचे दर्शन घेतले. अशी माहिती स्वामी समर्थ केंद्र इंदापूर शहर प्रमुख सेवेकरी प्रदीप भगत यांनी दिली. इंदापूर शहरातील मयुर हाउसिंग सोसायटी महतीनगर आवारात असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये उपस्थित भाविकांना बंसोदे काका वय वर्ष ७८ यांनी स्वामी समर्थांची माहिती सांगितली. यावेळी युवराज राऊत, जे के शिंदे, विकास खिलारे, शिवतेज दडस, महेश वेदपाठक, गुरुनाथ वायकुळे, सागर धारूरकर, निखिल दुनाखे, अथर्व भगत, युवराज जगताप, सोमनाथ तारगावकर, नितीन देवकर पाटील, पंचकमिटी, विभाग प्रतिनिधी, तसेच पुरुष व महिला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील मुक्काम संपून इंदापूर शहरांमध्ये आगमन झाले. यावेळी पादुका पूजनसाठी १८३ भाविकांनी दर्शन घेतले व धान्य पूजनसाठी १०६ भाविकांनी  दर्शन घेतले. खूप मोठ्या संख्येने पादुका पुजा सेवा सेवेकरी व भाविकांनी राजोपाचार पादुका पूजन व धान्य पूजन या दोन्ही पूजा परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या कृपाशीर्वादाने माननीय श्री सतीश दादा मोटे यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाल्या. तसेच सर्व महिला व पुरुष सेवेकरी यांनी मेहनत घेऊन सर्व सेवा श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी सेवा रुजू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *