दि. २६ डिसेंबर

चलो वर्धा सेवाग्राम,चलो विधानभवन नागपूर..
इंदापूर : लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी सेवाग्राम वर्धा येथून पायी पदयात्रेस सुरूवात होणार आहे सदर पदयात्रा दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी यशवंत स्टेडियम नागपुर हिवाळी अधिवेशनावर पोहचणार असून सदर पदयात्रेचे रूपांतर एक दिवसीय महाधरणे आंदोलनात होणार आहे अशी माहिती दत्ताभाऊ जगताप पुणे जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना यांनी स्वराज्य न्यूज शी बोलताना दिली.
सेवाग्राम वर्धा येथून २६ डिसेंबर पासुन निघणाऱ्या पदयात्रेनंतर दि २९ डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम नागपूर येथे महाधरणे आंदोलन होणार आहे या पदयात्रा व महाधरणे आंदोलनात लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व मातंग समाजातील बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी केले. पदयात्रा व महाधरणे आंदोलनाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत.
एक दिवस मांगासाठी..!
भावी पिडीच्या भविष्यासाठी..!!!
पदयात्रेत मी स्वत: सहभागी होतोय,आपणही सहभागी व्हावे.
लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य
असे आवाहन पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी समाज बांधवांना केले.
