- दि. १० जानेवारी

इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिशय प्रामाणिकपणे व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले व गेल्या ४० वर्षापासून अखंडित ग्राहक सेवा करीत असलेले ननवरे कुटुंबियांचा व्यवसाय चप्पल विक्रचा. मुख्य बाजारपेठेत व शहरात अनेक चप्पल दुकाने मोठ्या जोमात व थाटात चालू आहेत .त्यास ग्राहकांनी मनापासून आजपर्यंत पसंती दर्शविली आहे. ही विश्वासार्हता टिकवुन ठेवत असतानाच आधुनिक काळातील ग्राहक हा आपले शहर सोडून दुसऱ्या शहरात जाऊ नये व चप्पल, बूट, सॅंडल व वेगवेगळ्या व्हरायटी खरेदी करू नये इतक्या दिवसात मनापासून जपलेली विश्वासार्हता अशीच कायम राहावी यासाठी ननवरे कुटुंबियांनी आद्ययावत असे इंदापूर शहराच्या वैभवात भर घालणारे आर्यन शू वर्ल्ड या अद्यावत ब्रँडेड शोरूमचा शुक्रवारी माजी मंत्री आमदार दत्तात्रय (मामा) भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते व प्रदीप (दादा ) गारटकर (पुणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), आप्पासाहेब जगदाळे (माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर), प्रवीण (भैय्या) माने (माजी बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे), मधुकर भरणे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर), भरत शेठ शहा (व्हाईस चेअरमन कर्मयोगी सहकारी साखर कारखाना ),यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन तहसील कचेरी व नवीन नगर परिषदेसमोर १०० फुटी रोड छत्रपती संभाजी राजे शॉपिंग सेंटर इंदापूर गाळा नंबर ५८,५९ येथे शुक्रवार दि. १३ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होत आहे आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक विठ्ठल (आप्पा) ननवरे माजी नगराध्यक्ष इंदापूर नगरपालिका यांनी केले आहे.
