दि. १० जानेवारी

इंदापूर प्रतिनिधी : भिगवन तालुका इंदापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये आरपीआय मातंग आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षपदी नितीन आरडे यांची नियुक्ती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन करण्यात आली.
नितीन आरडे हे गेल्या १५ वर्षापासून एक निष्ठेने पक्षाचे काम करीत असल्याने त्यांना प्रमुख पदावर काम करण्याची संधी पक्षाने दिली . आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कै. हनुमंत साठे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी नितीन आरडे यांना काम करण्याची संधी गेले पाच वर्ष मिळाली होती. सध्या नवीन कार्यकारिणी व फेरबदलामध्ये नितीन आरडे यांना आरपीआय मातंग आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाने या निवडीचे स्वागत करण्यात आले. पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आले.
नितीन आरडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पक्षाचे काम मनापासून व एक निष्ठेने करून मातंग समाजाला आठवले साहेबांच्या माध्यमातून व पक्षाच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली.
यावेळी विक्रम शेलार (पुणे जिल्हाध्यक्ष), शिवाजीराव मखरे (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष), संदिपान कडवळे (सरचिटणीस पुणे जिल्हा), बाळासाहेब सरवदे (तालुका अध्यक्ष),अमोल मिसाळ (इंदापूर शहराध्यक्ष),उपस्थित होते .
