दि. ३० जानेवारी

गेल्या दोन वर्षात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक गावातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडली नऊ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन पॅनल समोरासमोर निवडणुकीच्या रिंगणात होते पैकी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने पैकीच्या पैकी म्हणजे नऊच्या नऊ सदस्य निवडून आणून ईतिहास घडविला. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे पॅनल प्रमुख पंढरी काका चंदनकर,भरत आप्पा चंदनकर व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन देशमुख हे होते….. जरी सरपंच पद हे सदस्या मधून असले तरी ग्रामपंचायतीचा अनुभव सर्व सदस्यांच्या पाठीशी असणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्वांना संधी मिळाली पाहिजे हा हेतु  पॅनल प्रमुखांचा होता. प्रत्येक सदस्यांना कमी कालावधी मिळाला तरी काही हरकत नाही  म्हणून आज ३० जानेवारी रोजी निवडून आलेल्या सदस्यांपैकी सौ शोभा हनुमंत शेलार यांची आलेगाव बुद्रुक ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची बिनविरोध निवडणूक पार पडली

या निवडणुकीसाठी सर्व सदस्य व सरपंच सौ सोनाली लक्ष्मण कवडे,   जयसिंग काका चंदनकर , बंडू चंदनकर , संजय काळे, उत्तम वाघमारे, सत्यवान वाघमारे ,जगन्नाथ कांबळे, किशोर खांकाळ, दादा गायकवाड, मच्छिंद्र शेलार, बाळू शिरतोडे, बाळासाहेब चंदनकर ,रामा पवळ, बापू कवडे, समाधान पाटील, दत्तात्रेय चंदनकर ग्रामस्थ तसेच ग्रामसेवक बी आर लोकरे उपस्थित होते. नूतन उपसरपंच यांचे ग्रामस्थ सदस्य व पंचक्रोशीतील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले व त्यांना पुढील कालावधीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

या निवडणुकीसाठी विशेष उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल चव्हाण व रोहित खंडागळे जिल्हा उपाध्यक्ष व विशाल नवगिरे महासचिव सोलापूर जिल्हा दिलीप आप्पा चव्हाण उपजिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उपस्थित होते

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक बी आर लोकरे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *