
इंदापूर ता. २०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष इंदापूरच्या शिवजयंतीचे प्रणेते माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक काढून ( दि.१९) ३९३ वी जयंती मोठ्या दिमाखदार, उत्साहात,जल्लोषात साजरी करण्यात आली.
यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय ( मामा) भरणे, नगराध्यक्ष अंकिताताई शहा, मुकुंदशेठ शहा, शकुंतला रत्नाकर मखरे, ॲड. राहुल मखरे यांनी जेतवन बुद्धविहारात तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत सामूहिक पंचशील त्रिशरण घेण्यात आले. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मानवंदना दिली.
यावेळी विठ्ठलराव ननवरे, गणेश महाजन, अरविंद वाघ, बाळासाहेब ढवळे, बाबजी भोंग, अविनाश कोथमिरे, ॲड. समीर टिळेकर, शकीलभाई सय्यद, राहुल गुंडेकर, माऊली नाचण, हरिदास हराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बुद्धविहार आंबेडकरनगर पासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. हलगी, शिंगाडे,घोडे व ब्रास बँडच्या गजरामध्ये उत्साहपूर्व वातावरणात मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मिरवणुकीत वृद्धांसह,विद्यार्थी व तरुणांनी हलगीच्या ठेक्यावर मनमुराद नृत्य करत आनंद घेतला.

मिरवणुक नगरपालिका मैदानात दाखल झाल्यानंतर बारामतीचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, भारत अहिवळे, बळीकाका बोंगाणे,माऊली नाचन, बाळासाहेब वाघमारे, लालासाहेब कांबळे (पुणे) आदींनी छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना पुष्पहार व शिवजयंतीचे प्रणेते दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा जयंती कमिटीच्या वतीने सत्कार केला.
यावेळी जयंती कमिटीचे आयोजक बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे म्हणाले की, शिवजयंतीचे प्रणेते माझे वडील दिवंगत रत्नाकर मखरे यांनी शहरात सुरू केलेली शिवजयंतीची परंपरा यापुढेही आम्ही अविरत चालू ठेवू. यापुढेही आपला असाच साथ संयोग मला मिळो हीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो.
यावेळी ॲड. समीर टिळेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास चव्हाण यांची भाषणे झाली. यानंतर नियोजित विद्रोही शिवभिमशाहिर शिवाजी कांबळे यांचा शाहीरी जलसाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमास हमीद आतार, अभिजित चव्हाण,मधुकर जगताप, भास्कर साळवे, युवराज बन,अश्वजीत कांबळे, विलास शिंदे, पत्रकार संतोष आटोळे, सुरेश मिसाळ, श्रेयस नलवडे, अतुल सोनकांबळे तसेच शिवप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन ॲड. समीर मखरे, गोरख तिकोटे संजय कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर आभार नानासाहेब चव्हाण यांनी मानले.
