इंदापूर : (दि.१)

बुधवारी पहाटे इंदापूर पोलीस स्टेशन अंकीत बावडा पोलीस स्टेशन हद्दीत अवैदय रित्या हातभट्टी व्यावसाय असुन गावठी हातभट्टी दारू बनविण्यासाठी रसायन वेगवेगळ्या ठिकाणी बॅरल मध्ये ठेवले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली नुसार धडक कारवाई करून चार जणांवर गुन्ह दाखल करण्यात आला.
कारवाई मध्ये रसायनाने भरलेले तीनशे लिटरचे बॅरल ०३ नग , दोनशे लिटर १२ नग, शंभर लिटर ०१ नग व इतर साहित्य असा एकूण २,४९000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये ०४ जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे .
आगामी होळी, ग्रामदैवत यात्रा, जयंती उत्सव व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस यांच्याकडून अवैध धंद्यावरती धाडी टाकून धडक कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती श्री. आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के बी शिंदे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, लखन साळवी पोलीस शिपाई विकास राखुंडे, विनोद काळे, समाधान केसकर यांनी मिळून केली.
