दि. ०७ मार्च

इंदापूर : होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, आळस, द्वेष, मत्सर, मतभेद यांचे दहन होऊन, सर्वांना निरोगी व उत्तम आरोग्य लाभावे तसेच प्रत्येक कुटुंबामध्ये आनंद, सुख आणि शांती कायम तेवत राहावी, अशा शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी होळी व धुलीवंदनाच्या जनतेला शुभेच्छा मंगळवारी व्यक्त केल्या.

भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीनकालापासून होळी व धुलीवंदन सणास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या सणाच्या निमित्ताने होळीच्या अग्निमध्ये विचारांची नकारात्मकता जळून जाऊन प्रेम, शांती, आनंद हा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केल्या.

तसेच जीवन सुंदर आणि रंगीबेरंगी असून, ही होळी तुमच्या आयुष्यात आणि प्रत्येक कुटुंबामध्ये अधिक प्रेम आणि आनंदाचे रंग निर्माण करेल, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी होळी व धुलीवंदनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *