दि. ०८ मार्च
इंदापूर : आज जागतिक महिला दिन.या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला वषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी व अधिकारासाठी लढा दिलेला हा दिवस म्हणजेच जागतिक महिला दिन.
आज आपण असेच जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाज कार्य करणाऱ्या खऱ्या अर्थाने दुर्लक्षित झालेल्या इंदापूर येथील मानव विकास परिषदेच्या प्रदेश सचिव रेशमा नौशाद शेख यांच्या विषयी त्यांचे उल्लेखनीय कार्य जाणून घेऊया.
रेशमा नौशाद शेख या मुळच्य श्रीगोंदा जि जळगाव या ठिकाण च्या रहिवाशी. नौशाद शेख यांच्याबरोबर लग्न होऊन इंदापूर या ठिकाणी सासरी आल्या. बालपण व शिक्षण श्रीगोंदा या ठिकाणी गेले. शाळेत असताना कबड्डी, खो खो अशा खेळाची आवड होती. संपुर्ण शालेय शिक्षण घेत असताना शाळा भरण्याच्या अगोदर शाळेच्या पटांगणात खेळाचा सराव मुलींना घेऊन करायची आवड व यातुनच अनेक पुरस्कार मिळविले. इयत्ता ५वी पासुन १० वी पर्यंत संघनायक म्हनुन राहिल्य . यातुनच समाज कार्याकडे कल वाढला.
मुस्लिम समाजातील महिला शक्य तो इतर समारंभात दिसत नाहीत परंतु रेशमा शेख यांना हे पसंद नाही. जाती धर्माचे पलिकडे जाऊन सतत दुसर्यांना व महिलांना मदत करण्यासाठी पुढे असतात. कुणी नावे ठेवली म्हनुन यांचे समाजकार्य थांबत नाही हे विशेष. बदनामीला यांनी कधीही भिक घातलीच नाही. त्या कधी जातीभेद मानत नाहीत. रूढी परंपरेला छेद देऊन महिलांना मदत करतात. महापुरुषांच्या जयंती उत्सवात त्यांचा नेहमी सहभाग असतो.
शालेय जीवनात शिक्षण घेत असतानाच वडिलांना कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासले त्यावेळी कुटुंबाची प्रचंड वाताहत झाली. आजारपणामुळे मोठ्या भावाला शिक्षण अर्धवट सोडावे लागले व कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली. त्यावेळी वडिलांच्या आजारपणात मदतीला पाहिजे तशी माणसे पाठीशी उभी राहिली नाहीत ही खंत मनात होतीच आणि याच भावनेने आपण समाजाचे देने लागतो या भावनेने त्यां काम करतात . जे शक्य आहे ती मदत करायची हेच त्यांचे ठरलेले असते. त्या मुस्लिम असुन देखील इतर धर्मियां च्या देवाच्या जत्रा, सण, उत्सवात फक्त त्यांचा सहभाग च नसतो तर मोफत स्वयंपाक करून देतात त्या उत्तम स्वयंपाकी देखील आहेत. त्यांच्या या समाजकार्याला त्यांचे पती नौशाद शेख यांचा भक्कम पाठिंबा आहे म्हनुनच मी घराबाहेर पडून लोकांची मदत करू शकते असेही रेशमा शेख म्हणाल्य.
. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अहिल्या रत्न, राजमाता बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य समाज गौरव पुरस्कार , जिजाऊ रत्न पुरस्कार, नव दुर्गा पुरस्कार , वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा विभाग यांच्या वतीने सन्मान चिन्ह, इंद्रेश्वर महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान इत्यादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या सर्व कामाची दखल घेऊन मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी त्यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली.
रेशमा शेख यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा कितीतरी महिला समाजाची सेवा मनोभावे
करीत आहेत,पण त्यांचे कार्य दुर्लक्षितच राहिले आहे,.आज महिला दिनानिमित्त त्यांच्या या कार्याला सलाम …..
…..महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *