
इंदापूर : आज जागतिक महिला दिन या दिवशी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा झालेला खडतर प्रवासा विषयी त्यांचा गुणगौरव होणे गरजेचे आहे.
छायाताई पडसळकर ,महिला तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, यांच्या विषयी इंदापूरच्या राजकारण व समाजकारणातील आयर्न लेडी म्हणून पहिली जाते.त्यांच्यामध्ये असणारी कठोर निर्णय क्षमता हा त्यांचा सर्वोत्तम गुण आहे.स्त्रियांच्या बाबतीत त्या नेहमी आक्रमक असतात, प्रसंगी आंदोलनासारखे हत्यार उगारून महिलांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा हातखंडा आहे.
बऱ्याच लोकांसाठी महिलांची भूमिका केवळ घरातील कामे करण्यासाठीच मर्यादित असतात तथापि यामध्ये बदल होणे आवश्यक आहे,कारण स्त्रिया पुरुषांसारख्या प्रत्येक गोष्टीत समान स्वातंत्र्यांनी संधीसाठी पात्र आहेत. छायाताई पडसूळकर या २००७ साली काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदार संघातून काटी पंचायत समिती गणातुन उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या. त्यांना उमेदवारी मिळाली ती त्यांच्यात असणारी आक्रमकता, सर्व सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करण्याची तळमळ व त्यांच्यावर असणारा संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार ,अजितदादा पवार ,संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे, दत्तात्रय मामा भरणे, प्रदिपदादा गारटकर यांचा विश्वास. २००८ साली पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपविली. या पदाच्य माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट काम केल्याने ओबीसी सेल महिला तालुका अध्यक्ष म्हनुन देखील नियुक्ती केली. याही पदावर काम करीत असताना समाजातील महिलांना योग्य न्याय
दिल्याने अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्यात २०१७ साली सावता परिषद अरण ता. माढा या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले. पुढच्याच वर्षी म्हणजे२०१८ साली संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका महिला आघाडीचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली ,नव्हे त्यांच्या आक्रमक व महिलांविषयी असणाऱ्या तळमळीमुळे व काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.
समाजामध्ये बदल होणे आवश्यक आहे, आपण सर्व माणसे आहोत त्याचप्रमाणे समान हक्क आणि समान संधी सर्वांना मिळाले पाहिजेत. आतापर्यंत स्त्रियांपेक्षा पुरुषांना समाजामध्ये अनेक संधी प्राप्त झाले आहेत. मागील काही वर्षाचा आलेख पाहिला तर स्त्रियांनी अनेक क्षेत्रांमध्ये विलक्षण कामगिरी केली आहे.
छायाताईंना मिळालेले तालुकाध्यक्ष पदाचे संधीचे सोने करून महिला बचत गट मोठ्या प्रमाणावर स्थापन केले व त्यातूनच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला एकत्र केल्या व महिलांची आरोग्य विषयी अनेक शिबिरे घेण्यात आली. कुटुंब व्यवस्था सक्षमपणे सांभाळल्यामुळे अनेक मातांना आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले. कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या अनेक महिलांना “मर्दानी महाराष्ट्राची” या पुरस्काराने गौरविण्यात आले व त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. याच कामाची दखल घेउन पक्षाने त्यांची पुन्हा २०२१ साली महिला तालुकाध्यक्षपदी फेरनिवड केली व सावता परिषदेचे कल्याणराव अखाडे, दत्तात्रय मामा भरणे, यशवंत तात्या माने यांच्या हस्ते “सामाजिक जीवन गौरव”पुरस्काराने गौरविण्यात आले.
विविध पुरस्काराने गौरविण्यात आल्याने व कामाचा आवाका वाढल्याने त्यातच आणखी एक जबाबदारी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी छायाताई यांच्या खांद्यावर सोपविली आणि ती जबाबदारी म्हणजे महिला आयोगाच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपविली.
छायाताईंच्या कामाची दखल समाजातील विविध घटकातील काम करत असणाऱ्या सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी तर घेतलीच परंतु पत्रकार दिनाच्या औचित्य साधून राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना इंदापूर या ठिकाणी “सावित्रीबाई फुले” पुरस्काराने गौरविण्यात आले.
या सर्व महत्त्वाच्या पदावर काम करीत असताना त्यांच्यामध्ये असणारी निर्णय क्षमता व आव्हानाला पेलण्याची जिद्द असल्याने हे शक्य झाले.
आपल्या समाजामध्ये स्त्री किंवा महिला अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतात कधी ती ग्रहणी असते,कधी ती आई असते,कधी ती बायको असते, कधी ती आजी असते.
