दि. १५ मार्च

इंदापूर : काल (दि १४) पंचायत समिती इंदापूर येथे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी जो बेमुदत संप पुकारला , त्यास तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.या पाठिंब्याचे पत्र तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई नानासाहेब खरात यांनी कर्मचारी संघटनेस दिले.

यावेळी अनीताताई खरात यांनी पाठिंबासंबंधीचे पत्र देऊन जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू व्हावी ,आमदार खासदारांना पेन्शन मिळते मग माझ्या कर्मचारी बंधूंना का नको. शेतकरी व कर्मचारी हा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शासन नेहमीच शेतकऱ्यांकडे आणि कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करते, अशा सरकारचा तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने मी निषेध करते असे खरात यांनी ठणकावून सांगितले, 

तसेच तेजपृथ्वी ग्रुप या माझ्या कर्मचारी बंधूंच्या कायम पाठीशी राहील अशी घोषणा अनिताताई खरात यांनी यावेळी केली.

यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे गणेश भाऊ शिंगाडे, संदीप रेडके,सुधीर पाडूळे,तानाजी हेगडकर,सद्दाम बागवान, गोकुळ कोकरे ,रुपेश वाघमोडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *