दि. १४ मार्च

इंदापूर : जंक्शन येथील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजनेचे माजी तालुका अध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांची सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
सागर बाबा मिसाळ संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना ज्येष्ठ, विधवा, परितक्त्या महिला व अपंग बांधवांसाठी तालुक्यात केलेले अफाट काम व या कामाच्या बळावरच खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार माजी मंत्री व आमदार दत्तात्रय मामा भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांनी दखल घेऊन सागर बाबा मिसाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली.
नियुक्तीनंतर बोलताना सागर बाबा मिसाळ म्हणाले की माझ्यावर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब, माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आमदार दत्तात्रय मामा भरणे,जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांनी सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली या सर्वांचे मी आभारी आहे. भविष्यात या सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पक्षाची ध्येयधोरणे व पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यरत राहील व सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका ठेवून काम करेल.
नियुक्तीचे पत्र देताना जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे उपस्थित होते.
सागर बाबा मिसाळ यांची राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून योग्य व सार्थ निवड झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे. या नियुक्ती बद्दल जंक्शन येथे ग्रामस्थांच्या वतीने सागर बाबा मिसाळ यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
