दि. २२ मार्च

इंदापूर (दि २२) : आज(दि २२) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंगणगाव ग्रामस्थांनी येणाऱ्या ग्रामदैवत भैरवनाथाच्य यात्रेच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीत परमेश्वर (नाना) देवकर यांची भैरवनाथ यात्रा कमिटी च्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. 

सालाबादप्रमाणे हिंगणगावचे ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी असते यावर्षी ही यात्रा ७ एप्रिल रोजी आहे. दरवर्षी सर्व ग्रामस्थ मिळून मोठ्या उत्साहाने ही यात्रा पार पाडतात. यात्रेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे इतर वायपट खर्चाला फाटा देऊन ही यात्रा संपन्न होते. देवाच्या घोड्यचाया छबीना व दुसर्या दिवशी महाप्रसाद असे यात्रचे स्वरूप असते.यात्रेत सुरुवातीपासूनच वर्गणी गोळा करण्यापासून यात्रा पार पडेपर्यंत परमेश्वर (नाना) देवकर मोठ्या उत्साहाने सहभागी होतात म्हणूनच सर्व ग्रामस्थांनी मिळून त्यांची अध्यक्षपदी एकमताने निवड केली, तर खजिनदार पदी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रदीप देवकर तर सचिव पदी दिगंबर आरडे यांची निवड झाल्याचे उपस्थित सर्व ग्रामस्थांनी टाळ्याच्या गजरात जाहीर केले व त्यांचे स्वागत केले. 

यावेळी माजी सरपंच रमेश देवकर, पोलीस पाटील शरद पाटील, बाळासाहेब पाटील, सचिन पाटील, चांगदेव खराडे, माजी उपसरपंच विजय काटे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब आरडे, व्यंकट आरडे,लहू पाटील, सुभाष देवकर, मोहन देवकर, लक्ष्मण देवकर, दगडू देवकर, आजिनाथ खराडे, प्रकाश देवकर, वकील देवकर, सिद्धेश्वर खराडे, बिभीषण देवकर, विकास आरडे, राजेंद्र खराडे, कुंडलिक आरडे, राहुल आरडे, नारायण हजारे, नितीन आरडे ,स्वप्निल आरडे, योगेश आरडे, योगेश जगताप व असंख्य तरुण व ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते. 

(अध्यक्ष) परमेश्वर (नाना) देवकर, (खजिनदार) प्रदीप देवकर, (सचिव) दिगंबर आरडे यांचे सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले व यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा ही दिल्या. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *