दि. ३० मार्च

सर्वधर्मसमभावाची शिकवण ज्या महापुरुषांनी आपणास दिली त्या महापुरुषांचा आदर्श व विचारांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष काम करेल. महापुरुषांनी एका जातीसाठी काम केलेले नाही तोच आदर्श व महापुरुषांचा विचार डोळ्यासमोर ठेवून आमचा पक्ष काम करणार असे स्पष्ट प्रतिपादन पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांनी केले.
पक्षाचे पदाधिकारी फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम करतील. शेतकरी ,कामगार, मजूर, कष्टकरी, दलित, शोषित, वंचित यांच्या न्याय हक्काची जाणीव पक्षाच्या माध्यमातून करणार असून या घटकांसाठी प्रसंगी शासन व प्रशासनाबरोबर प्रखर संघर्षाची तयारी आहे असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजयभैय्या सोनवणे यांनी केले. यावेळी पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या. तालुका, जिल्हा, राज्य कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर भविष्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करणार असल्याचे सांगितले. पदाधिकाऱ्यांनी शिस्तीत पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पक्ष वाढीसाठी काम करावे. अनुभवी व संघटन कौशल्य असणाऱ्यांना व आपणही समाजाचे देणे लागतो ही भावना ज्यांच्यामध्ये असेल अशांना पक्षात संधी दिली जाईल असेही शेवटी संस्थापक अध्यक्ष संजयभैय्या सोनवणे यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी अंगद गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
नविन नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे
संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष मा. सागर कुलकर्णी
पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.संजय नाना सोनवणे
पुणे जिल्हा अध्यक्ष मा.विकास भोसले
सोलापूर जिल्हा पुर्व जिल्हा अध्यक्ष मा.लखन भंडारे
सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हा अध्यक्ष मा.महेंद्र जाधव
कामगार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष मा.अभिजित गायकवाड
सोशल मीडिया पुणे जिल्हा अध्यक्ष मा.वैभव भोसले
पुणे जिल्हा युवक अध्यक्ष मा.सचिन आढाव
पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष मा.विजय बनसोडे
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा.हनुमंत शेळके
इंदापूर तालुका अध्यक्ष मा.अंगद गायकवाड
पुणे जिल्हा युवक सरचिटणीस मा.मनोज सोनवणे
पुणे जिल्हा संघटक मा.राजु भैय्या सोनवणे
इंदापूर तालुका कार्याध्यक्ष मा.नितीन सोनवणे
इंदापूर तालुका युवक कार्याध्यक्ष मा.विशाल जगताप
इंदापूर तालुका संघटक मा.ज्ञानदेव लोढे
इंदापूर तालुका युवक अध्यक्ष मा.तुषार भोसले
इंदापूर तालुका उपाध्यक्ष मा.आदिनाथ मोरे
इंदापूर तालुका सरचिटणीस मा.दिनेश गायकवाड
इंदापूर तालुका युवक उपाध्यक्ष अमोल ढोबळे.
संजयभैय्या सोनवणे यांनी घोषित केले प्रमाणे नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारिणी सर्वसमावेशक आसलेचे दिसते.
