दि. ०१ एप्रिल

इंदापूर : मानव विकास परिषद चे पुणे जिल्हा सचिव महिपत तात्या कदम भाटनिमगाव ता. इंदापूर यांचे मेहुणे पंढरीनाथ (दादा) नरहरी गवळी राहणार भाटनिमगाव व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यांचे दि. २४ मार्च रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय. ५५ वर्ष होते.
पंढरीनाथ दादा देवा घरी गेल्याचे कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली .ते अतिशय दिलदार मनाचे व गावात सर्वांशी सलोख्याचे संबंध जपणारा राजा माणूस काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून व्यक्त केले.
ते अतिशय कष्टाळू व प्रेमळ स्वभावाचे प्रगतशील बागायतदार म्हणून पंचक्रोशीत त्यांची ओळख होती. त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांचा दशक्रिया विधी दिनांक ०२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता निरा नरसिंहपुर येथे होणार आहे.
