दि. २२ एप्रिल

इंदापूर : शहरात अल तक्वा मस्जिद, गणेशनगर, येथे काल (दि.२१) अखेरच्या दिवशी सौरभ लक्ष्मण शिंदे यांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी चे आयोजन केले होते. यावेळी शहरातील मुस्लिम बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सौरभ शिंदे हे नेहमी समाज उपयोगी व सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी प्रयत्नशील असतात. महापुरुषाचे जयंती किंवा विविध जाती धर्मातील सण उत्सव सर्वांना सोबत घेऊन करण्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो. काही दिवसापूर्वी अल तकवा मज्जित कडे जाणाऱ्या रस्त्यावरील ड्रेनेज चेंबर फुटले होते त्यामुळे मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी त्या रस्त्याने जाताना कसरत करावी लागत होती, ही बाब मुस्लिम बांधवांनी सौरभ शिंदे यांना याची कल्पना देताच तात्काळ सौरभ शिंदे यांनी नगरपालिकेतील प्रशासनाला कल्पना देऊन स्वखर्चाने त्याची दुरुस्ती केल्याने मुस्लिम बांधवांनी त्यांचा जाहीर नागरी सत्कार केला होता. 

आज देखील मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील उपवासाच्या शेवटच्या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करून मुस्लिम बांधवांना गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या व कायमस्वरूपी आम्ही आपल्या पाठीशी आहोत याची ग्वाही देऊन हे कृतीतून दाखवून दिले त्याबद्दल मुस्लिम बांधवांनी समाधान व्यक्त केले. 

यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल (आप्पा )ननवरे, आझाद पटेलमामा , समीर बागवान, इम्रान बागवान, अल्ताफ बागवान,अशोक मखरे सर, दादा सोनवणे,असिफ बागवान,शुभम नलवडे,सुशांत किर्ते,अक्षय शिंदे, प्रफुल दराडे, व अल तक्वा बॉईज व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *