दि. २३ एप्रिल

इंदापूर : काल ( दि.२२) रोजी पवित्र रमजान ईद च्या सणानिमित्त शीरखुर्मा खाण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या घरी अनेक जाती धर्मांच्या लोकांबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली त्यात पत्रकार बांधव देखील उपस्थित होते यावेळी मानव परिषद च्या प्रदेश सचिव रेशमा शेख यांच्या घरी देखील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली त्यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानून वरील उद्गार काढले. व उपस्थित पत्रकारांचे गुलाब पुष्प व लेखणी देऊन स्वागत केले. 

सविस्तर माहिती अशी की पवित्र रमजान चे उपवास संपूर्ण महिनाभर मुस्लिम बांधवांचे असल्याने अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते ,पदाधिकारी यांनी आपापल्या परीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. याचा मागोवा घेताना अनेक पत्रकारांनी जातीय सलोखा व सर्व धर्म समभाव टिकण्यासाठी या कार्यक्रमाची प्रसिद्धी करून खऱ्या अर्थाने समाजातील जबाबदार नागरिकांबरोबरच आपली देखील ही जबाबदारी आहे असे समजलेने आज पत्रकारांचा सन्मान देखील करणे गरजेचे आहे असे उद्गार रेश्मा शेख, प्रदेश सचिव मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांनी काढले. यावेळी उपस्थित पत्रकारांचा गुलाब पुष्प व लेखणी देऊन सन्मान करण्यात आला. 

शीरखुर्मा खाण्यासाठी रेश्मा शेख यांच्या घरी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली त्यात राजकीय,सामाजिक, शासन व प्रशासनातील तसेच मानव विकास परिषद चे पदाधिकारी, इंदापूर पोलीस स्टेशन दक्षता समितीच्या पदाधिकारी ,पोलीस खात्यातील अनेकांनी हजेरी लावल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले. 

 यावेळी दीपक अण्णा काटे (प्रदेश सचिव भाजप युवा मोर्चा), दत्ताभाऊ जगताप (पुणे जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना), महिपत ( तात्या) कदम (पुणे जिल्हा सचिव,मानव विकास परिषद) बाळासाहेब पाटोळे सामाजिक कार्यकर्ता व अनेक पत्रकार देखील उपस्थित होते. 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *