दि. २८ जून

इंदापूर : तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात यांचा वाढदिवस (दि.२९) होणार सामाजिक उपक्रमाने साजरा

नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून नेहमी गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, शालेय विद्यार्थी, युवक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे अनिताताई खरात यांचा जन्मदिवस विविध उपक्रमांनी इंदापूर तालुक्यात संपन्न होत आहे.

अनिताताई खरात या महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवणे, गोरगरिबांना मदत करणे हे तर काम नेहमीच करीत असतात परंतु त्या कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय संसद सरपंच संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नासाठी सतत प्रयत्नशील असतात.

अनेक प्रश्नावर नेहमी काम करत असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अनिताताई खरात आणि त्यांच्या वाढदिवशी वेगवेगळ्या गावातील ग्रामस्थांनी व युवा कार्यकर्त्यांनी अनिताताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्यां कामाला साजेल असेच सामाजिक उपक्रम घेण्याचे ठरवले आहे,मग त्यात खोरोची,रेडणी, हिंगणगाव, इंदापूर, टेंभुर्णी, वडापुरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी तेथील स्थानिक ग्रामस्थांनी व युवकांनी अनिताताईचयां वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, फळे वाटप, लहान मुलांना खाऊ वाटप ,वृद्ध मातापित्यांना जेवण असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *