दि. ९ जुलै

 इंदापूर : ( दि.९ ) :- इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत पँथर रत्नाकर मखरेंच्या (तात्या) ७२ व्या जयंतीचा कार्यक्रम भिमाई आश्रमशाळेत छोटेखानी पार पडला.

 

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

  यावेळी बौद्धाचार्य बाळासाहेब सरवदे,किशोर धाईंजे यांच्या हस्ते व आयु. शकुंतला रत्नाकर मखरे, ॲड. राहुल मखरे,संतोष मखरे, ॲड. समीर मखरे व कुटुंबीयांच्या उपस्थितीत दिवंगत रत्नाकर मखरेंच्या (तात्या) समाधीस्थळी त्रिशरण पंचशील घेऊन पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नानासाहेब चव्हाण,बाळासाहेब सरवदे,माऊली नाचण,बाबजी भोंग, सागर (बाबा) मिसाळ, साहेबराव पवार, सविता गोफणे आदींनी आपापल्या भाषणांतून तात्यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकत आठवणींना उजाळा दिला.

 

यावेळी कार्यक्रमास अर्जुन चव्हाण, मधुकर जगताप, भास्करराव साळवे, शाहिद भाई शेख, राहुल शिंगाडे, महेश लोंढे,दिपक मगर, गोरख तिकोटे, संजय कांबळे, अश्वजीत कांबळे, युवराज बन, संतोष शेंडे,दादासाहेब देवकर, ॲड.सूरज मखरे,पत्रकार नीळकंठ मोहिते, अशोक घोडके, दत्तासाहेब मिसाळ तसेच महिला व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. राहुल मखरे यांनी केले ,सूत्रसंचालन व आभार नानासाहेब सानप यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *