दि. १२ जुलै

इंदापूर : (दि १२) माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू संस्थापक अध्यक्ष असलेल्या प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे यांच्या वाढदिवसानिमित्त जुनी मार्केट कमिटी इंदापूर येथे आज (दि १२) रोजी संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले
आपंग बांधवांसाठी व त्यांच्या कल्याणासाठी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी घेतलेला ध्यास व त्या प्रेरणेने सर्व अपंग बांधव महाराष्ट्र मध्ये एक दिलाने आपल्या न्याय हक्कासाठी संघटनेच्या वतीने कार्यरत असताना एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन सर्वांचा आनंद द्विगुणी करीत असतात आज देखील पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

यावेळी तालुकाध्यक्ष अनंतराव गायकवाड , उपाध्यक्ष संजय तुपे, सचिव रामदास चव्हाण, शहराध्यक्ष सचिन सूर्यवंशी, शहर उपाध्यक्ष दादासाहेब पाटोळे, आघडीच्या तालुका अध्यक्ष दीपालीताई वाघमोडे, उपाध्यक्षा सूक्ष्म ढाणे, शहराध्यक्ष सबीया आतार, शहर उपाध्यक्ष, युनूस शेख, तुषार शेंडे, रहीम शेख, राजाभाऊ अंकुश ,किसन भांगे व अनेक अपंग बांधव उपस्थित होते.
