दि. १६ जुलै

राज्यामध्ये विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून महायुती झाली आहे त्यामुळे आता आपण टीका टिप्पणी कोणावर करायची त्यापेक्षा आपण विकासाचे राजकारण करणे गरजेचे असल्याचे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी लाकडी (ता इंदापूर) येथे विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केले यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी बोलताना सांगितले की या भागाचा महत्त्वाचा असलेला शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश आले आहे त्याचबरोबर गावातील महिलांच्या डोक्यावरील कायमचा हंडा उतरवण्याचे काम आहे केल्याने परिसराचा विकास झाला आहे त्यामुळे गेल्या काही वर्षात विकासाबाबत जे राजकारण झाले त्याकडे लक्ष न देता गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून गावातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे त्यासाठी आगामी काळात होणारी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत गावची ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास आपण गावच्या विकासासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्याची व्यवस्था करू त्यामुळे सर्वांनी विकासासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहनही भरणे यांनी यावेळी केले त्याचबरोबर लाकडी परिसराच्या विकासासाठी रस्ते पाणी आधी प्रश्नांचे कायमचे उत्तर आपण शोधल्याने गाव नावलौकिक वाढला आहे गावातील आरोग्य उपकेंद्र असेल अथवा अंतर्गत रस्ते असतील यासाठीही निधी दिला गेला आहे त्यामुळे कामे दर्जेदार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे ठेकेदार कोणीही असो चांगले काम करणार नसेल तर त्याचे काम तात्काळ थांबवा असे आवाहनही ग्रामस्थांना आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले यावेळी प्रताप पाटील, सचिन सपकळ, श्रीमंत ढोले,द्रोपदा वनवे, बाळासाहेब खरमाटे, दादा वनवे ,महेश वनवे ,रायचंद्र वनवे ,आप्पा ढोले ,हरिचंद्र वनवे काशिनाथ वनवे ,संजय सांगळे, तुकाराम पवार ,यांच्यासह ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. चौकट ….. लाकडी गावावर आपण पहिल्यापासूनच विशेष लक्ष देत होतो : भरणे ……………ज्यावेळेस लाकडी गावातील शेतीची किंमत वीस हजार रुपये होती त्यावेळेस आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून या गावाला खास बाब म्हणून 19 हजार रुपये प्रति एकराने कर्ज पुरवठा केला त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन त्यांची शेती व व आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर सुधारण्यास मदत त्यावेळेस अनेकांनी मला हे शेतकरी कर्ज कसे फेडणार असा सवाल केला होता मात्र ही कष्टाळू जनता आहे निश्चित कर्ज फेल हा विश्वास ठेवूनच आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून या गावाला विशेष सहकार्य केले त्यामुळे गावही सातत्याने माझ्या पाठीशी उभा असल्याचे समाधान होत आहे . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *