दि. ०७ सप्टेंबर

इंदापूर : कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज स्मारक येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील लहान गावातील कर्तव्यदक्ष डॉ.धिरज शिंगटे यांना भारत भूषण पुरस्काराने,शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, फोटो , ट्रॅफि, हार व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी यांच्या सोबत त्याचा परिवार ही उपस्थित होता.
कोल्हापूर जिल्हा दै.रोखठोक च्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र तून कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केला जातो. इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील गरीब कुटुंबातून परिस्थिती वर मात करत चिकाटीने अभ्यास केला .
या पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज स्मारक भवन दसरा चौक येथे जगद्गुरु विद्या नरसिंह भारती शंकराचार्य व उपजिल्हाधिकारी शिवाजीराव शिंदे पुणे ,संजय शिंदे अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर, पोलीस निरीक्षक डी.वाय.एस.पी.मोतीलाल मोरे,दै.रोखठोक चे संपादक सुरेश माडकर यांच्या हस्ते दिनांक 6 सप्टेंबर 2023 बुधवारी दुपारी 4, वाजता प्रदान करण्यात आला . यावेळी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पुरस्कार प्राप्त व्यक्ती उपस्थित होते.
