दि. ०७ सप्टेंबर

इंदापूर : येथील उमाजी नाईक नगर मध्ये आद्यक्रांतीगुरु नरवीर राजे उमाजी नाईक
यांची २३२ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आद्य क्रांतिगुरू नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन केले. यावेळी
इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे व कर्मवीर सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेरमन माजी उपनगराध्यक्ष भरत शेठ शहा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात जयंती संपन्न झाली.
यावेळी मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे,बन्सी बंडलकर,संतोष बंडलकर,भाऊ बंडलकर,भिमा जाधव,आकाश पाटूळे, भाऊ पाटूळे प्रमोद राऊत,अभिजीत अवघडे
जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष अभिषेक चव्हाण, उपाध्यक्ष विजय पाटूळे,खजिनदार किरण मंडले,कार्याध्यक्ष निखिल मंडले,सागर सोनवणे,प्रसाद चव्हाण,रितेश बंडलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
