दि. ०८ सप्टेंबर

 

गाव तिथे शाखा,शाखा तिथे न्याय,समता,बंधुता

 

                या कार्यक्रमा अंतर्गत

 शाखा उदघाटन समारंभ सोहळा व जाहीर सभेचे

                       आयोजन

 

इंदापूर : गुरुवार,(दि.७)तालुक्यात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष शाखा उदघाटन सोहळा संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सरडेवाडी व गोखळी या दोन्ही गावात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी कडाळे,इंदापूर तालुका उपाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी जल्लोषात हलगी च्या कडकडाटासह आणि जेसीबी तुन पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केले .

यावेळी बोलताना संजीव भैया सोनवणे म्हणाले की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष व त्या पक्षामध्ये काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर एका कुटुंबासारखे काम करीत असून पक्षांमध्ये काम करीत असणारा पदाधिकारी व कार्यकर्ता हा स्वावलंबी बनण्यासाठी पक्ष काम करतोय. पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ता हा मालक म्हणून जगण्यासाठी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बारा बारा लाख रुपयांचे कर्ज प्रकरणे मंजूर करून दिले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एखाद्या कुटुंबावर शेतकऱ्यावर शोषित पीडित दलित वंचितांवर अन्याय झाला तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष त्यांच्या मदतीला धावून जाईल व त्यांना न्याय मिळवून देईल अशी ग्वाही दिली. पुढे बोलताना असेही म्हणाले की गोखळी गावातील वन विभागाने दिलेल्या नोटिसांच्या बाबतीत संबंधितांनी पुन्हा मोजणी करावी अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा समाजातील विविध स्तरातील घटकांसाठी भविष्यात काम करेल असे त्यांनी ठासून सांगितले. 

        संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांनी लोकहिताची अनेक कामे केली आहेत. इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणारा शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचा त्या पाण्यावर असणारा हक्क यासाठी प्रचंड आक्रमक आंदोलन करणारा तालुक्यातील पहिला कार्यकर्ता म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. सरडेवाडी टोल प्लाजा मध्ये कार्यरत असणारे कामगार व स्थानिकांना टोलमध्ये सवलत मिळावे यासाठी तेरा दिवस आक्रमक आंदोलन करून स्वतःच्या अंगावर पोलीस केस झाली तरी बेहत्तर पण मागे न हटणारा असा त्यांचा स्वभाव. 

 

गोखळी शाखा कार्यकारिणी

 

 शाखा अध्यक्ष : उत्कर्ष शिंदे ,

        उपाध्यक्ष : अजित शिंदे .

        कार्यध्यक्ष : ज्ञानेश्वर वाघमोडे .

             सचिव : अविनाश पोळ .

. खजिनदार : अशोक महानवर .

       सरचिटणीस : गणेश पडळकर .

              संघटक : समीर मदने .

          सह संघटक : सजेश डोंबळे .

 

    सरडेवाडी कार्यकारिणी

 

शाखा अध्यक्ष : किशोर कडाळे .

       उपाध्यक्ष : सागर शिंगाडे .

       कार्यध्यक्ष : सुराज सलगर

            सचिव : हरी जमदाडे

   युवक अध्यक्ष : करण सरडे

        मार्गदर्शक : पोपट दंडेल

 

या वेळी पंढरपूर तालुक्यालील भाळवणी या गाव चे स्वाभिमानी नेते करीम भाई शेख यांनी शेकडो कार्यकर्त्यासह महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले. 

यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते मार्गदर्शक माढा सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायण गायकवाड, 

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय नाना सोनवणे, 

पुणे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले, 

पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष अभिजित भैय्या गायकवाड, 

पुणे जिल्हा युवक आघाडी सचिन आढाव, 

सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र जाधव, 

सोलापूर जिल्हा संघटक विनोद सरोदे, 

सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन पठारे, 

पुणे जिल्हा कार्यध्यक्ष विजय बनसोडे, 

पू .जि. यु. कार्यध्यक्ष विशाल जगताप, 

वरुटे चे सरपंच पू.जि.संघटक नितीन सोनवणे, 

पू.जि.सरचिटणीस सोनवणे, 

पू.जि.यु.संघटक राजेश सोनवणे, 

पुणे जि.विध्यार्थी संघटक अध्यक्ष संकेत गायकवाड, 

पुणे जि .वाहतूक सेना उपाध्यक्ष दीपक कांबळे, 

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे मार्गदर्शक अमजद भाई शेख, 

सो.जि उपाध्यक्ष अमोल ननवरे, 

पुणे जिल्हा सरचिटणीस समाधान चव्हाण, 

पुणे जिल्हा संघटक अर्जुन गायकवाड, 

इंदापूर ता. अध्यक्ष अंगद गायकवाड, 

इंदापूर ता.यु .अध्यक्ष तुषार भोसले, 

माढा ता. अध्यक्ष कालिदास गायकवाड, 

माण ता. यु. उपाध्यक्ष अमित बनसोडे, 

मान ता. कार्यध्यक्ष लक्ष्मण कांबळे, 

माळशिरस ता कार्याध्यक्ष उत्तम सरतापे, 

इंदापूर ता .संघटक सागर पांढरे, 

इंदापूर ता .सरचिटणीस अमोल कांबळे, 

इंदापूर शहर अध्यक्ष विलास लांडगे, 

पंढरपू ता वाहतूक सेना निलेश ननवरे, 

पंढरपू ता .संघटक मिथून नाईकनवरे, 

युवा नेते देवाजी मोरे उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *