दि. ०९ सप्टेंबर

माजी आमदार धनाजीराव साठे यांचे चिरंजीव व संतकुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.दादासाहेब साठे यांचा वाढदिवस तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून प्रत्येक वर्षी साजरा केला जातो .वाढदिवसाच्या निमित्ताने पदाधिकारी व तरुण यांच्यामध्ये नवचैतन्य असते.
दादासाहेब साठे हे तालुक्यातील प्रत्येकाच्या सुखाच्या व दुःखाच्या प्रसंगी उपस्थित राहून संबंधित कुटुंब व अन्याय अत्याचार पीडितांना मानसिक आधार देत असतात, त्यामुळे त्यांच्याविषयी समाजामध्ये व विशेषतः तरुणांमध्ये आदर व आपुलकी आहे.
आज रांजणी देवाची येथे दादासाहेब साठे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रांझणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांसह सरपंच पांडुरंग माने,विलास जाधव, दादा माने,सातव आबा, नारायण गायकवाड, मुख्याध्यापक लोंढे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
