दि. १२ नोव्हेंबर

दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर नवीन संकल्पना व नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा – हर्षवर्धन पाटील

 

 

इंदापूर : दीपावली उत्सवातील दिव्यांचा प्रकाश हा जनतेच्या आयुष्यामध्ये नवी ऊर्जा, उमेद व समृद्धी त्याचबरोबर प्रत्येकास निरोगी दीर्घायुष्य देईल, अशा शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा व्यक्त केल्या.

           दीपावली हा वर्षातील सर्वात मोठा उत्सव असून हा तेजोमय दिव्यांचा सण आहे. तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये आनंदाचा हा प्रकाश कायम तेवत राहावा, अशी शुभेच्छा व्यक्त हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्येकाने आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर नवीन संकल्पना व नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवे स्वप्न, नवे क्षितीज त्याचबरोबर पुन्हा एक नवी आशा निर्माण व्हावी, अशी सदिच्छाही यानिमित्ताने हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

         ते म्हणाले, दीपावलीचा सण आनंदाने व उत्साही वातावरणात साजरी करताना नागरिकांनी कुटुंबीयांच्या अरोग्याची काळजी घ्यावी. तसेच दिपावली सणाच्या माध्यमातून जगामध्ये आदर्श असलेल्या भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करावे, नव्या पिढी पुढे चांगल्या कौटुंबिक संस्कारांचा आदेश घालून द्यावा, असे आवाहनही जनतेला शुभेच्छा देताना याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *