दि.२१ डिसेंबर

माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालय शैक्षणिक सहलीच्या बसचा थांबलेल्या टेम्पोला सहलीच्या एस. टी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर एक शिक्षक जखमी झाला आहे. या अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला. 

 

मिळालेल्या माहितीनुसार एस टी क्रमांक एम एच 14 बी टी 4701 ही बस सहल घेऊन गेली होती. या अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाठ यांना डोक्याला किरकोळ जखम झाली आहे तर शिक्षक बाळकृष्ण काळे जागेवरच मयत झाले आहेत.जखमी व मयताला 108 अकलूज 0742 या अॅम्बुलन्सने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *