इंदापूर : शिवभक्त परिवार इंदापूर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे दि. १२ जानेवारी २०२४ रोजी कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे तेरावे वंशज सयाजी नामदेव गुजर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. कामधेनु सेवा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मणराव आसबे यांचे व्याख्यान यावेळी होणार आहे. याप्रसंगी सर्व आजी-माजी सैनिक, एस.आर. पी. एफ., सी. आर. पी .एफ. यांच्या माता किंवा पत्नी यांचे जिजाऊ पूजन यावेळी करण्यात येणार आहे.

          दरवर्षी इंदापूर महाविद्यालयात जिजाऊ जन्मोत्सव व युवा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

     या ऐतिहासिक जिजाऊ पूजनास व पुरस्कार प्रदान समारंभास आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *