इंदापूर : बावडा परिसराचा तसेच बावडा लाखेवाडी जि.प. गटाचा आज पर्यंत झालेला सर्वांगीण विकास हा फक्त भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामुळे झालेला आहे. हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली बावडा भागात विकासाची गंगा घराघरात पोहोचली आहे, असे गौरवोद्गार बावडा ग्रा.पं. सरपंच पल्लवी गिरमे यांनी काढले.

                 नागरिकांच्या पुढील 40 ते 50 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करून बावडा भागात हर्षवर्धन पाटील यांनी विकासाची कामे केली आहेत. बावडा येथे हर्षवर्धन पाटील साहेब यांनी मंत्रीपदावर असताना वालचंदनगर रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत उभी केली आहे. बावडा गावातील झालेल्या सर्व विकासकामांना हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातूनच निधी मिळाला आहे. बावडा गाव व वाड्यावस्त्यांना रु.15 कोटी रुपयांची विस्तारित नळ पाणीपुरवठा योजना हर्षवर्धन पाटील यांनी सध्या मंजूर केली आहे. आगामी काळात बावडा भागात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू राहणार आहे, अशी ग्वाही सरपंच पल्लवी गिरमे यांनी दिली.

____________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *