सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे , राष्ट्रीय सेवा योजना व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आयोजित ‘युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास ‘ उपक्रमांतर्गत बिजवडी ता. इंदापूर येथे दि. 23 जानेवारी ते दिनांक 29 जानेवारी या कालावधीत विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की आपल्या यशस्वी जीवनामध्ये संस्कारक्षम आचरणाला अधिक महत्त्व असून यातून जबाबदार नागरिक व सक्षम युवा पिढी घडते.

       राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी महाराष्ट्र राज्य संपर्क अधिकारी डॉ.रामेश्वर कोठावळे यांच्या हस्ते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

     हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ विद्यार्थी जीवनामध्ये संस्कार शिबिरे अत्यंत महत्त्वाचे असतात. नव्या पिढीला जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीची गरज आहे , जबाबदारीची जाणीव होणे आणि त्यातून उत्तम नागरिक घडण्यासाठी त्याला शालेय शिक्षणाबरोबरच जीवनातील इतर अनेक गोष्टींची माहिती मिळण्यासाठी ही शिबिरे अत्यंत उपयोगी ठरत असतात .शिबिर कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना त्या परिसरातील त्या व्यक्तींचे प्रश्न , समाजाचे प्रश्न , समाजाची रचना तसेच आवश्यक असणाऱ्या संस्काराची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असते. विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांचा विकास करून यशस्वी व्हावे.’

   डॉ. रामेश्वर कोठावळे म्हणाले की ,’ मन ,मनगट आणि मेंदू सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे उपयोगी ठरतात .विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या व्यक्तिमत्वासाठी ,नेतृत्व विकासासाठी तसेच देशाच्या विकासासाठी संस्कारश्रम शिबिरे महत्वपूर्ण आहेत. विद्यार्थ्यांनी समाजातील अनेक प्रश्नांची माहिती घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत व्हावे.’

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून इंदापूर महाविद्यालय आणि उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून प्रा. गौतम यादव यांना सन्मानित करण्यात आले होते यावेळी प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , प्रा. गौतम यादव आणि प्राध्यापिका मनीषा गायकवाड यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

     अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अर्थबोध चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी पाहुण्यांची ओळख करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.

    यावेळी सरपंच कोमल कचरे , संस्थेचे संचालक विलासराव वाघमोडे ,तुकाराम जाधव ,गणपत भोंग , कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक छगन भोंगळे ,माजी संचालक मच्छिंद्र अभंग , माजी उपाध्यक्ष माऊली बनकर , माजी संचालक छगन बोराटे तसेच सुरेश मेहेर , हनुमंत जाधव , नारायण वीर ,साहेबराव पिसाळ ,डॉ. शिवाजी वीर, डॉ.भिमाजी भोर ,डॉ.सदाशिव उंबरदंड यावेळी उपस्थित होते.

     राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. उत्तम माने यांनी आपल्या प्रास्ताविकात शिबिर कालावधीत होणाऱ्या उपक्रमाविषयीची माहिती दिली.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोहिदास भांगे यांनी केले.

   आभार उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी मानले .                  

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका मनीषा गायकवाड , प्रा. प्रशांत साठे , प्राध्यापिका सुवर्णा जाधव, प्रा.धनंजय माने, प्रा.अमोल मगर व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *