दि.३१ जानेवारी

इंदापूर : येणारी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गाव भेट दौऱ्याचे करण्यात आले. मंगळवार
(दि.३०) जानेवारी रोजी काटी तालुका इंदापूर गावात नागरिक व मतदाराशी संवाद साधताना त्यांच्या भावना जाणून घेत असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा प्रभारी गणेश लोंढे यांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असे भाकीत केले आहे.
गणेश लोंढे म्हणाले की बारामती लोकसभा मतदार संघात गावभेट दौऱ्या दरम्यान मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधल्यानंतर. असे जाणवले की सत्ताधार्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार आहे.
गावभेट दौऱ्या दरम्यान शेतकरी, युवक, बेरोजगार, महिला यांचे प्रश्न आजही ज्वलंत आहेत. हे घटक आजही ऊपेक्षितच आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या भावना अतिशय तीव्र जाणवल्या, लोसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर उमेदवार असतील तर आपली भूमिका काय याची चाचपणी केली असता महादेव जानकर हे निस्वार्थी उमेदवार या मतदारसंघाला लाभला तर निश्चितच आमच्या जीवनाचे सोने होईल अशी तीव्र भावना अनेकांनी व्यक्त केल्याने महाराष्ट्रात व मतदार संघात सत्ता परिवर्तन होणार असल्याचा अंदाज गणेश लोंढे यांनी व्यक्त केला.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व महासचिव माऊली नाना सलगर यांच्या सूचनेनुसार बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये इंदापूर तालुक्यात घोंगडी बैठका गाव भेट दौरा सुरू करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजी शिंगाडे, तालुका कार्याध्यक्ष नवनाथ कोळेकर, श्रीनिवास सातपुते प्रवक्ते, शहराध्यक्ष लक्ष्मण तरंगे तालुका उपाध्यक्ष, शाखाध्यक्ष तुकाराम करे, गणेश हेगडकर, तात्याराम मारकड, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
