दिनांक १ फेब्रुवारी

इंदापूर :
ज्या दिव्यांग बांधवांना हात नाही किंवा पाय नाहीत, अशा दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हात व पाय रोपण करुन जीवनात आधार देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन च्या वतीने उपक्रम राबविण्यात येत आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीदिनी यासाठी विशेष शिबीर इंदापूर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा ग्रामीण कक्ष प्रमुख सीमा कल्याणकर यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, महाराष्ट्र राज्य शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांसाठी हे शिबिर होणार आहे.
हात, पाय नसलेल्या लोकांना, कृत्रिम हात आणि पाय मिळून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होणार आहे.हात पाय नसणा-या जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सीमा कल्याणकर यांनी केले आहे.
यासाठी भूषण सुर्वे ८४४६६६०३३१, सीमा प्रशांत कल्याणकर ७७९६६८८२१४, सागर आवटे ९९७०८४८४५४, ॲड.आनंद केकान ९९६०२५०४००, सोमनाथ लांडगे ९५०३५२११११, तसेच सुरेश मिसाळ (इंदापूर ) ९८९०८१२२४७ यांना संपर्क करून नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
