दिनांक ०५ फेब्रुवारी

 

साखरेवस्ती शाळेच्या प्रांगणात आनंदी बाजार मोठ्या उत्साहात साजरा,,

 

इंदापूर : जि प प्राथमिक शाळा साखरेवस्ती केंद्र रेडणी ता- इंदापुर जि- पुणे या ठिकाणी आनंदी बाजार आयोजित करण्यात आला होता.या आनंदी बाजाराचे उद्धाटन तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिताताई खरात यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी वरील उद्गार आपले मनोगत मध्ये काढले .

आपल्या उद्घाटन पर मनोगतामध्ये त्या म्हणाले की विद्यार्थी दशेत शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान आत्मसात होणे गरजेचे आहे आजच्या या आनंदी बाजारामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान आत्मसात होईल.

जिल्हा परिषद शाळा, रेडनी केंद्रीय शाळेत शाळेच्या भव्य प्रमाणात या आनंदी बाजाराचे आयोजन मुख्याध्यापक व सर्व उपशिक्षक यांच्या नियोजनातून करण्यात आली होती यावेळी उद्घाटक म्हणून अनिताताई खरात संस्थापक अध्यक्ष तेज पृथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्य या होत्या.

आनंदी बाजाराचे उद्घाटन शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाले यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष गणेश साखरे, अण्णा खरात सदस्य, अंगणवाडी ताई सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक शाळेचे उपशिक्षक काकासाहेब जाधव आणि मल्लिकार्जुन वच्चे गुरुजी यांनी केले.या आनंदी बाजाराचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांना कमवा व शिका याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी या साठी आनंदी बाजार घेण्यात आला.या बाजारात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ,व वस्तूचे स्टॉल लावले होते.यात भेळ,गुलाबजामुन,वडापाव ,इडली चटणी,भजे व पालेभाज्या आदी खाद्य पदार्थांचे स्टोल लावले होते.तसेच या बाजारात व्यवसायातून आपल्याला नफा तोटा कसा होतो या बद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले या बाजाराचा सर्व विद्यार्थ्यानी पालकांनी शिक्षकांनी मनमुराद आनंद घेतला.

 

कार्यक्रमाचे आभार शाळेचे उपक्रमशील शिक्षक मल्लिकार्जुन वच्चे यांनी मानले तर सूत्र संचालन काकासाहेब जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *