दिनांक १३ फेब्रुवारी

पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे यांची धडाकेबाज कामगिरी
इंदापूर : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत उरुळी कांचन गावच्या हद्दीत एक इसम बेकायदेशीर तलवार हे हत्यार जवळ बाळगत असल्याचे गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे यांना समजले वरून सदर आरोपीस पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे व पोलीस कर्मचारी यांनी गोपनीय माहिती मिळालेले ठिकाणी जाऊन सदर इसमास तलवारीसह ताब्यात घेतले.
सविस्तर माहिती अशी मौजे बोरीभडक तालुका दौंड जिल्हा पुणे गावचा २१ वर्ष वयाचा तरुण उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत उरुळी कांचन गावच्या हद्दीत बेकायदेशीर तलवार जवळ बाळगत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे यांना समजले या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलीस स्टाफसह गोपनीय माहिती मिळालेल्या नमूद ठिकाणी जाऊन सदर युवकास तलवारीसह ताब्यात घेतले व त्याच्यावर भा.ह.का.क.४ (२५) महा.पोलीस कायदा १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मत्रे हे करीत आहेत.
घडलेल्या गुन्हेच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मीडिया (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप) व इतर माध्यमातून कोणीही बेकायदेशीर शस्त्र बाळगणे शस्त्रासोबत दहशत माजविण्याचे उद्देशाने रील बनविणे, फोटो व्हायरल करणे, अशा स्वरूपाचे प्रकार केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे समाजविघातक इसमांची गय केली जाणार नसल्याचे नमुद केले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग स्वप्नील जाधव, पोलीस निरीक्षक स्था.गु.अ.
शाखा अविनाश शेळीमकर, पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे पोलीस हवालदार रणजीत निकम, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस कॉ. दीपक यादव यांनी या कारवाईत भाग घेतला.
