दिनांक १५ फेब्रुवारी

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत १३ फेब्रुवारीला भाजपामध्ये प्रवेश केला भाजपाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देखील दिली.याच पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस खडबडून जागी झाली. अशोक चव्हाण यांच्या नंतर काँग्रेस मधील अनेक नेते व आमदार भाजपात जातील अशी चर्चा चालू झाली. यातच एक महत्त्वाचे नाव होते ते म्हणजे चंद्रकांत हंडोरे.

याच चंद्रकांत हंडोरेंना काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केले आहे. चंद्रकांत हंडोरेंचा विधान परिषदेमध्ये पराभव झाला होता. तरीही राज्यातील बंडाळी रोखण्यासाठी काँग्रेसने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

देशातील ५६ राज्यसभेच्या जागेसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील सहा जागा आहेत. सहापैकी एका जागेवर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. तर महायुतीकडून पाच उमेदवार असणार आहेत. पैकीं भाजपाने आपले तीन उमेदवार जाहीर केले तर अजित पवार यांनी आपला एक उमेदवार जाहीर केला आहे व एकनाथ शिंदे यांनीही एक उमेदवार जाहीर केला आहे.

आजच (१५ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

 

काँग्रेसने महाराष्ट्रात राज्यसभेची उमेदवारी दिलेले

चंद्रकांत हंडोरे यांचा परिचय पुढीलप्रमाणे

 

चंद्रकांत हंडोरे यांचा राजकीय प्रवास १९८५ साली चालू झाला मुंबई महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले.

१९९२ – ९३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले.

२००४ मध्ये चेंबूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले व विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात थेट कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतल्याची चर्चा आहे. ते त्यांच्या कामाची पद्धत आक्रमक होते.

२००९ साली पुन्हा आमदार म्हणून निवडून आले परंतु सत्तेच्या स्पर्धेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.२०१४ ते २०२१ महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून राहिले.

ते भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत व ते आंबेडकरवादी म्हणून परिचित आहेत.

विशेष म्हणजे ते काँग्रेसमध्ये असताना देखील भिम शक्ती संघटनेच्या माध्यमातून आपला दबाव गट कायम ठेवला आहे.

सध्या ओबीसी, अल्पसंख्यांक आणि सामाजिक परिस्थितीवरून तापलेले राजकारण पाहता सामाजिक प्रयोगशीलतेचा चेहरा म्हणून काँग्रेसला हंडोरे यांना संसदेत नेण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *