दिनांक १७ फेब्रुवारी

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाराला पोलीस निरीक्षक शंकर पाटील व पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे यांचा दणका

 

कोरेगाव मूळ तालुका हवेली येथील हॉटेल चायनीज कट्टा समोर एक लाल रंगाची स्विफ्ट कार उभा असून या कारमध्ये दोन कोयतासह दोन अनोळखी युवक आहेत अशी माहिती खबऱ्याने उरुळी कांचन पोलीस स्टेशन यांना दिल्याने माहितीची खातरजमा करून कारसह दोघांना ताब्यात घेतले.

स्विफ्ट कार सह ताब्यात घेण्यात आलेले १) चंद्रशेखर दाजी चोरमले राहणार माळी मळा तालुका हवेली व

२) आकाश मधुकर लांडगे राहणार उरुळी कांचन बस स्टॉप पाठीमागे तालुका हवेली जिल्हा पुणे यांना मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या बेकायदेशीर लोखंडी कोयता व लाल रंगाची स्विफ्ट कार (क्रमांक MH 12 -UJ 0388 ) ताब्यात घेउन भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व महाराष्ट्र कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला

 

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक ,बारामती संजय जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी ,दौंड.स्वप्निल जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, सहाय्यक फौजदार नवले, पोलीस हवालदार रणजीत निकम, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस शिपाई दीपक यादव, पोलीस शिपाई सुदर्शन माने यांनी केली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *