दिनांक ४ मार्च

इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांचा राजकिय वाद शिगेला पोहचला आहे. जाहीर कार्यक्रमांमध्ये दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. परंतु गेल्या आठवड्यात गंगावळण येथील जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी हर्षवर्धन पाटील यांना तालुक्यात फिरू न देण्याची धमकी दिल्याचे प्रकरणा नी वेगळेच वळण घेतले आहे.
सविस्तर माहिती अशी की गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी गंगावळण येथील जाहीर कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यातील फिरु देणार नाही असे खालच्या पातळीवरचे वक्तव्य करून धमकी वजा इशाराच दिला.याची गंभीर दखल घेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवाला धोका असुन सुरक्षा पुरविणे बाबत पत्राद्वारे मागणी केली आहे तसे पत्र त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर प्रसिद्ध केले आहे.
शिवराळ व एकेरी बेताल वक्तव्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होणार का ? मुख्यमंत्री व गृहमंत्री कडक कारवाई करणार का ? याकडे जनतेचे लक्ष
इंदापूर तालुक्यातील राजकारणाची पातळी अतिशय खालच्या पातळीवर गेली असून भविष्यात हा संघर्ष शिगेला पोहचणार व त्याचे गंभीर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेला हे अभिप्रेत नाही.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वतःला सुरक्षा पुरविणे बाबत मुख्यमंत्री व गृहमंत्र्याकडे पत्राद्वारे मागणी केल्याने तालुक्यातील सामान्य जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे व या पत्राची चर्चा तालुका भर होत आहे.
.
