दिनांक ०५ मार्च

इंदापूर  : भारतीय जनता पार्टीच्या बुथ चलो अभियान, गाव भेट दौऱ्याचे नियोजन करणे संदर्भात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनानुसार इंदापूर तालुक्यातील भाजप पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांची बैठक इंदापूर येथे दूधगंगा दूध संघामध्ये बुधवारी (दि.6) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठकीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या बुथ चलो अभियान, गाव भेट दौरा अभियानाचे नियोजन केले जाणार आहे. या बैठकीस इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार, इंदापूर भाजपचे शहराध्यक्ष शकील सय्यद, भाजप तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार खराडे आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

___________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *