दिनांक ०६ मार्च

दुसरा राष्ट्रीय लाईनमन दिवस उत्साहात साजरा

 

बारामती दि. ६ मार्च, २०२४ – राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अखंडित विजेसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या लाईनमनचे योगदान महत्वाचे असून, त्याची दखल म्हणूनच ४ मार्च हा दिवस देशभरात ‘लाईनमन दिवस’ म्हणून साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी केले आहे.

 

महावितरणच्या ऊर्जा भवन कार्यालयात सोमवारी (दि. ४ मार्च) दुसरा राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अभियंता पावडे बोलत होते. ते म्हणाले, लाईनमन ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता सदैव तत्पर असतो. कोरोना महामारीच्या काळात सर्व समाज घरात असताना लाईनमन मात्र अहोरात्र झटत होता. विजेचे काम जोखमीचे आहे. त्यामुळे सर्व लाईनमन बंधुनी सुरक्षा साधनांचा वापर केलाच पाहिजे. टीम वर्क मध्ये काम करताना आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. तो सुरक्षा साधनांचा वापर करतो की नाही यावर लक्ष देणे. चुकत असेल तर वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे हिताचे ठरते.

या दिवशी बारामती विभागातील लाईनमन यांच्यासाठी विद्युत सुरक्षा या विषयावर अति. कार्यकारी अभियंता सचिन कोरडे यांनी सखोल मार्गदर्शन करत सुरक्षा साधनांचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व लाईनमनचा यथोचित गौरव करण्यात आला. तसेच सुरक्षा साधनांचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप देखील करण्यात आले. कार्यक्रमास अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे, कार्यकारी अभियंते संजय गायकवाड, म्हसू मिसाळ, संजय सोनवलकर, विजय सूर्यंवशी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय पवार व मधुकर साळवे यांचेसह ऊर्जा भवन मधील वरिष्ठ अधिकारी व बारामती विभागातील लाईनमन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांपैकी राजेंद्र शिंगाडे, कपिल पवार, झाकीर शेख, दामोदर कोकरे, हर्षद गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उप व्यवस्थापक (मासं) रामचंद्र बनकर, प्रस्तावना उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांनी तर वरिष्ठ व्यवस्थापक महेश जाधव यांनी आभार मानले. परिमंडलात सर्व विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयांपर्यंत लाईनमन दिनाचे आयोजन करण्यात

आले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *