दिनांक ०८ मार्च

इंदापूर : तालुक्यातील कांदलगाव च्या रहिवासी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. निलोफर पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. प्रदीप गारटकर पुणे जिल्हाध्यक्ष यांच्या सहीचे पत्र सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राधिका हॉल इंदापूर येथे देण्यात आले.

सौ.निलोफर पठाण या गेल्या अनेक वर्षापासून महिला बचत गटाच्या माध्यमातून तालुका भर कार्यरत आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. महिला व मुलींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्या आक्रमक पणे कार्यरत आहेत. सध्या त्या महिला दक्षता कमिटी इंदापूर पोलीस स्टेशन येथे सदस्य पदी कार्यरत आहेत. शितल त्यांच्या या संघटन कौशल्याचा पक्षाला फायदा होईल.

नियुक्तीचे पत्र देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप कोळसे पाटील माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, आचार विचार, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आ

हे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *