दिनांक ०९ मार्च

 

  •  ” ग्लोबलाझेशन पेविंग अ वे फॉर इंडिया अँड द वर्ल्ड ” या विषयावर परिसवाद
  • – सिंगापूर व यु. के.च्या दूतावासातील सल्लागारांची उपस्थिती 
  • – अंकिता पाटील ठाकरे यांचे संयोजन 

 

इंदापूर : वनगळी (ता. इंदापूर) येथील एस बी पाटील शैक्षणिक संकुल मध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत ग्लोबलाझेशन पेविंग अ वे फॉर इंडिया अँड द वर्ल्ड ” ( जागतिकीकरण भारत आणि जगासाठी एक मार्ग ) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे रविवारी (दि.10) आयोजन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या

अंकिता पाटील ठाकरे ह्या संयोजक आहेत.

या सेमिनारसाठी जॅकेयस लिम, सिंगापूर महावाणिज्य दूतावासाचे सल्लागार व जॉन निकेल, सल्लागार, यूकेचे उप उच्चायुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या परिसंवादामध्ये जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे महत्त्व, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताला संधी, प्रमुख आव्हाने व धोरणांवरती उहापोह होणार आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील संधी यावरही चर्चा होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या व्यासपीठावर अर्थतज्ञ, धोरणकर्ते, उद्योग नेते एकत्र येणार आहेत.

शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग वनगळी, एस बी पाटील कॉलेज ऑफ फार्मसी वनगळी हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इंदापूर, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण व श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

वनगळी येथील ए बी पाटील शैक्षणिक संकुलामध्ये विश्वेश्वरय्या सेमिनार हॉल येथे रविवारी सकाळी 10 वाजले पासून हे सेमिनार सुरू होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिसंवादासाठी भाग्यश्री पाटील, अंकिता पाटील ठाकरे, अँड. मनोहर चौधरी, किरण पाटील, डॉ. जीवन सरवदे आदी वरील शिक्षण संस्थांचे पदाधिकारी परिश्रम

घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *