दिनांक १० मार्च

इंदापूर : आज (दि १०) हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गट मेळाव्याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे.

आजच्या या होणाऱ्या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील काय बोलणार व या जिल्हा परिषद गटातील मतदारांना काय आवाहन करणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गट हा हर्षवर्धन पाटलांचा घरचा आणि हक्काचा मतदारसंघ आहे. या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व आजपर्यंत स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीपासून ते आज पर्यंत यांच्याच विचाराचा उमेदवार निवडून येत आहे. येथील मतदारांनी आजपर्यंत टोकाचा राजकीय संघर्ष पाहिला आहे. अशाही स्थितीत हर्षवर्धन पाटील यांनाच मतदारांनी खंबीर साथ दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यावर झालेल्या राजकीय अन्यायाचा बदला घेण्यासाठी येथील मतदार बदल्याच्या भूमिकेत आहे.

राजकीय विचित्र परिस्थितीत प्रमुख नेते मतदारांना आपापल्या भूमिकेविषयी भावनिक साद घालुन व भविष्यातील राजकीय वाटचाली संदर्भात अवाहन करीत असले तरी चाणाक्ष मतदार मतपेटीतून आपला राग व्यक्त करणार हे निश्चित आहे.

म्हणूनच हक्काच्या आणि घरच्या मतदारसंघात हर्षवर्धन पाटील काय बोलणार याकडे तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *