दिनांक ०१ मे

इंदापूर : लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा दुसरा टप्पा जस जसा जवळ येत आहे तसा राजकीय पक्षाचे नेते मंडळी मतदार राजाला आपल्याच पक्षाला मतदान करावे यासाठी उमेदवाराचे चिन्ह दाखवून मतदान करण्यासाठी गळ घालताना दिसत आहेत.
मतदार राजा सुद्धा येणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी यांना खुश करत आहे व म्हणत आहे आता तुम्ही म्हणाल तसंच होणार मतदान नक्की आपल्याच उमेदवाराला आम्ही देणार तुम्ही काळजी करू नका
हा मतदारराजा म्हणतोय .. खरं सांगायचं तर गेली पाच वरीस आम्ही याच संधीची वाट बघतुया,लय तरास झाला, आम्ही कईक येळा ह्यासनी सांगतूया पण नाय ऐकलं.आर लेका माझं काम लय बारीक होत,पोरीच लगीन धरलं होतं काय पैका आडका मिळलं म्हणलं होतं पण ह्याच पुढार्यांनं आठ पंधरा दिस हेलपाटं मारायाला लावलं मोठ्या पांढऱ्या काळया काचच्या गाडीतनं कवा यायचा अनं कवा जायचा कळतंच नव्हतं. एकदा तर ह्याची गाडी आली आम्हास्नी नवरा बायकोला वाटलं गाडी उभी राहिल आमच्याजवळ पण कशाचं काय धुरळा उडवून गाडी निघून गेली आम्हा नवरा बायकोच्या अंगावर सगळा धुरुळाच उडाला, बायको रडली अन् म्हणली आता नकु ह्यांच्या दारात.
लय मस्ती हाय रं ह्याला आता तुझं पैसं बी नकु आन तु बी नकु. आता ह्याला मतातंन दाखवु ह्यांन सांगल तिकडं नायच मतदान करायचं गड्या.
